ज्या मैदानाने मोठे केले त्याच्याप्रती व्यक्त केली कृतज्ञता वृक्ष वाटप करून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रतिनिधी…..तळवेल हे गाव संपूर्ण जिल्ह्यात आपल्या वेगळेपणासाठी प्रसिद्ध आहे.त्यात खो खो खेळासाठी विशेष प्रसिद्ध आहे.या गावाने शेषस्मृती क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व विद्यापीठ खेळाडू घडवले आहेत.यातीलच एक गुणी राष्ट्रीय खेळाडू प्रतीक देशमुख यांचा नुकताच विवाह संपन्न झाला.त्यांनी खो खो मध्ये अनेकदा मैदान गाजवले आहे.यातूनच त्यांनी शारीरिक शिक्षणातील उच्च पदवी धारण केली.परंतु. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी माऊली स्पोर्ट्स नावाने स्वतः चे प्र्रतिष्ठान उभे केले.त्यांनी या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली. परंतु ज्या मैदानाने आपल्याला स्वतः च्या पायावर उभे केले त्याची आठवण त्यांनी कायम ठेवली.लग्न झाल्यावर आपल्या जोडीदाराला घरी नेण्याआधी त्यांनी मैदानावर प्रवेश करून मौदानाचे पूजन केले व आपली कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांचे क्रीडा संघटक व तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे सचिव डॉ तुषार देशमुख व सौं स्वाती देशमुख यांनी औक्षण करून स्वागत केले. त्याचप्रमाणे लग्नाच्या स्वागत समारंभात येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना शेवगा वृक्षाचे वितरण ही करण्यात आले.यावेळी मैदानावर मंडळाचे जेष्ठ खेळाडू गजानन मेश्राम,सदाशिव देवताळे,गजानन काळे,शंभू देवताळे,हमराज वानखडे,मंदार गुडधे,मयूर खंडारे यांच्यासह सर्व खेळाडू प्रामुख्याने उपस्थित होते. या उपक्रमबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.









