श्रुतिका वऱ्हाडे,अनुष्का मेश्राम,संस्कृती काळे,आर्यन गेडाम,आनंदी कडू यांची विशेष कामगिरी
———————
चांदुर बाजार/प्रतिनिधी :-
श्री बाबाराव सार्वजनिक शिक्षण संस्था संचालित शंकर विद्यालय तळवेल चा निकालाची उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी ही कायम राहिली असून शाळेचा निकाल 100% एवढा लागला आहे.एकूण 29 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.त्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यामध्ये 8 विद्यार्थी प्रविण्य श्रेणित आले आहेत. प्रथम श्रेणित चौदा विद्यार्थी आहेत. विद्यालयातून प्रथम येण्याचा मान श्रुतिका वऱ्हाडे हिला मिळाला असून तिला 86% गुण मिळाले आहेत.त्याचप्रमाणे द्वितीय अनुष्का विनोद मेश्राम(84.40),तृतीय संस्कृती गजानन काळे(84.20%) चतुर्थ आनंदी संदिप कडू (83%),तर मुलांमध्ये प्रथम आर्यन संजय गेडाम (77.60) आला आहे.तर इतर प्रविण्य प्राप्त विद्यार्थ्यात श्रद्धा प्रवीण सांगोले(77.20%),समृद्धी राजेश कांबळे(77%),सलोनी सतपाल चौधरी(76.40%)यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख सचिव नरेंद्रराव देशमुख,सहसचिव रविराजदेशमुख यांच्यासह मुख्याध्यापिका सुचिता फुटाणे,वर्गशिक्षक विजय पांडे,भाष्कर काळे,प्रिया देशमुख, डॉ तुषार देशमुख,माया मंगळे,धीरज उसरबरसे, सदाशिव देवताळे,गजानन साबळे यांच्यासह सर्व पालक व गावकरी मंडळी यांनी अभिनंदन केले आहे.
**********
” शंकर विद्यालयाचा दरवर्षी उत्कृष्ट निकाल लागतो.यावर्षी पासून दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय शाळा उपक्रमात संस्था सहभागी होणार असल्याने शाळेला याचा फायदा होणार आहे.मी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन करतो “
– राजाभाऊ देशमुख,संस्था अध्यक्ष.








