प्रतिनिधी…..स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त आज एक आगळा वेगळा सत्कार समारंभ मोठया उत्साहात संपन्न झाला.शंभूराजे महान साहित्यिक ही होते.त्यांच्या जयंती दिनी अमरावती विद्यापीठाने बंदी घातलेले पुस्तक “ ते पन्नास दिवस”हे न्यायालयीन लढाईने पुन्हा अभ्यासक्रमातसमाविष्ट करण्यात आले.याकरिता ज्या संघटनानी प्रयत्न केले.त्या सर्वांचा सत्कार आम्ही सारे शिवप्रेमी च्या वतीने डॉ तुषार देशमुख व त्यांच्या सहकार्याच्या वतीने करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आम्ही भारतीय चे संस्थापक डॉ प्रकाश माणेकर होते. प्रमुख उपस्थिती म्हणून तिवसा चे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस अध्यक्ष वैभव वानखडे, जिल्हा युवक चे अध्यक्ष राहुल येवले, अमरावती विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, न्यायालयीन लढा लढणाऱ्या AISF च्या राज्य सचिव प्रतीक्षा ढोके, युवा नेते सागर दुर्योधन, NSUI चे संकेत साहू, प्रगतीशील लेखक संघांचे प्रा प्रसेणजित तेलंग, अ भा अनिस चे हरीश केदार,युवा पत्रकार राज माहोरे,आम्ही सारे शिवप्रेमी चे प्रा मयूर चौधरी,गौरव भोकसे,अजित काळबांडे,सुमित रिठे यांच्यासह जिल्ह्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी AISF,युवक काँग्रेस,तिवसा काँग्रेस,NSUI,अ भा अनिस च्या सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ तुषार देशमुख यांनी केले तर आभार प्रा मयूर चौधरी यांनी मानले.











